logo

रायपूर येथे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी.

रायपूर येथे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी. हिन्दू - मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन दिला माणूसकीचा परिचय

रायपूर येथे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी.

Aima news सादिक शाह बुलढाणा

रायपूर.दि 11 एप्रिल 2024 गुरुवार रोजी रायपूर येथिल ईदगाह प्रांगणात येथे मुस्लिम बांधवातर्फे मोठया प्रमाणात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली..जगभरातील मुस्लिम लोक ईद-उल-फित्र साजरा करतात, जो सर्वात महत्वाचा सण आहे.मात्र राज्यासह देशात सर्व मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मुस्लिम बांधवांना एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली.हा सण रमजानच्या शेवटी साजरा केला जातो. यामध्ये गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे. ईद-उल-फित्र साजरी करून, उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो. चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या प्रियजनांना भेटतात.गेल्या महीनाभर मुस्लिम बांधवांनी सतत कडक उन्हात उपवास ठेवले.सर्व हिन्दू मुस्लिम बांधवासाठी एकता अखंडता प्रेम संपूर्ण देशात सुखशांतीसाठी अल्लाहकड़े प्रार्थना केली.यामध्ये रायपुर येथिल सर्व समाजबांधवांनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने माणूसकीचा परिचय देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रायपूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री दुर्गेश राजपूत, राहुल जाधव, राजू गव्हाणे व त्यांच्या सर्व टीम यांनी कडक चोक बंदोबस्त ठेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसोबत सर्व मुस्लिम बांधवाना पुष्पगुच्छ देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.रायपुरात हिन्दू मुस्लिम बांधवांनी एकामेकांशी गळाभेट घेऊन एकता, बंधुता व अखंडता याचा संदेश मिळवून दिला. अश्या प्रकारे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

116
6201 views